मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

राधा झाली बावरी.. ऎकून पावा श्री हरीचा..

पसरला आज चोहीकडे..
श्रीहरीचा रंग...
गोपी गोपीका आता..
दही दुधात झाले दंग..


राधा झाली बावरी..
ऎकून पावा श्री हरीचा..
गुंतली ती पाव्याच्या स्वरात..
तोच तर पाया खरया प्रेमाचा...

चल गड्या रंगून जाऊ..
या दहीकालाच्या सणात.
त्या हंडीला फोडू अन..
न्हावून जाऊ दही दूध लोण्यात





कान्ह्या तुझी मुरली आज ,का साद मजला घालते?

कान्ह्या तुझी मुरली आज ,का साद मजला घालते?
पाव्यातली सुरावली सख्या ,आज काय मजला सांगते ?

फोडुनी मटकी का रे तुझी
तहान नाही भागते?
चोरुनी खावून लोणी-दही
भूक नाही भागते?
का मलाच मुरलीधरा ,तुझी मुरली होऊ वाटते?
पाव्यातली सुरावली सख्या ..........................
पाण्यातली रे मासोळी सख्या
बघ पोहणंही कशी विसरते?
वाहणारी यमुना बघ रे ,
का तिथेच थांबते ?
कोणती रे भूल सख्या ,साऱ्यांना तुझी छ्ळीते?
पाव्यातली सुरावली सख्या ,................
नगरी तुझीच म्हणून का रे
सत्ता तुझीच चालते ?
तुझीच का रे छबी मुकुंदा
गोपिकांना भावते ?
मीरा असो कि आणखी कुणी ,ही राधिका तुला भावते .......
पाव्यातली सुरावली सख्या ...................
कान्हा तू यशोदेचा सख्या
देवकी का तुला पूजिते?
तुझीच माझ्या मनमंदिरी
मूर्ती का रे राहते ?
दूर राहुनी तुझी सख्या रे ,मी चरणधूळ स्पर्शिते ......................
पाव्यातली सुरावली सख्या ,आज काय मजला सांगते ?