रविवार, ९ ऑक्टोबर, २०११

दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी

दुर्गे दुर्गटभारी तुजविण संसारी
अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरणांतें वारी
हारी पडलो आता संकट निवारी॥१॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
त्रिभुवनी भुवनी पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करता पडले प्रवाही
ते तू भक्तांलागी पावसि लवलाही॥२॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥
प्रसन्नवदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशापासुन सोडी तोडी भवपाशा
अंबे तुजवाचून कोण पुरवील आशा
नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा॥३॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथिनी
सुरवर ईश्वरदे तारक संजीवनी, जय देवी जय देवी ॥धृ॥

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०११

प्रभू स्मरला, भक्त रंगला

प्रभू स्मरला, भक्त रंगला, प्रभूच्या त्या कीर्तनी.. मम आत्मा एकरूप झाला ||धृ||
सुख असे ते काय अन दुःखाचे फळ ते काय,
लोभी अशा मज माणसासी वैराग्याचे मोल ते काय?
वाजे मृदंग, वाजे चिपळ्या, वाजे हृदयाची मंद हुरहूर..
प्रभू स्मरला, भक्त रंगला, प्रभूच्या त्या कीर्तनी.. मम आत्मा एकरूप झाला ||धृ||

राहो चित्ती प्रेम तुझे, वाहिले जरी अश्रूंचे झरे,
परी मज ते ना उमजले, अंतरी भाव दाटुनी आले,
एक तो समर्थ असे, समर्थ मज करी जगण्या जीवन हे,
प्रभू स्मरला, भक्त रंगला, प्रभूच्या त्या कीर्तनी.. मम आत्मा एकरूप झाला ||धृ||

मी अज्ञानी, शुल्लक अणु, विश्वरूपी तू कसे पाहावे,
पुण्याचे करितो संचय, पापाचे जरी भारता घडे,
या धरती, या वाळवंटी, चालत आहे आत्मा तरी,
प्रभू स्मरला, भक्त रंगला, प्रभूच्या त्या कीर्तनी.. मम आत्मा एकरूप झाला ||धृ||

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

*गणपतीची २१ नावं*

*गणपतीची २१ नावं*

आपल्या भारतीय संस्कृतीत गणपतीला अनन्य साधारण महत्त्व आहे. गणपती हे अति
प्राचीन दैवत आहे, वैदिक देव आहे, आदिदेव आहे. कोणत्याही शुभकार्यारंभी
अग्रपूजेचा प्रथम मान गणपतीलाच मिळाला आहे. श्रीगणेश हा सुख देणारा, दु:ख हरण
करणारा, दुष्टांना शासन करणारा आणि भक्तांना आनंद देणारा, कोट्यवधी लोकांचं
श्रद्धास्थान असलेला देव आहे. दरवषीर् कोट्यवधी लोक अष्टविनायकांचं, साडेतीन
पिठांचं आणि पुराणोक्त गणेशाचं मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतात. त्या
गणरायांच्या २१ नाव, रूप, त्याला आवडणारी फुलं, फळं, नैवेद्य आदींविषयी...

...........

*महाराष्ट्रातील प्रसिद्ध २१ गणपती*

१. मयुरेश्वर-मोरगाव, पुणे, २. सिद्धिविनायक-सिद्धटेक, अहमदनगर, ३.
बल्लाळेश्वर-पाली, रायगड, ४. वरद विनायक-महाड, रायगड, ५. चिंतामणी-थेऊर, पुणे,
६. गिरिजात्मक-लेण्यादी, पुणे, ७. विघ्नेश्वर-ओझर, पुणे ८. श्री
महागणपती-रांजणगाव, पुणे, ९. मंगलमूतीर्-चिंचवड, पुणे, १०. कसबा गणपती-पुणे,
११. सिद्धिविनायक-सारसबाग, पुणे, १२. गणेश-कढाव, रायगड, १३. टिटवाळा-महागणती-
ठाणे, १४. पुळ्याचा गणपती-रत्नागिरी, १५. हेदवीचा दशभुज-रत्नागिरी, १६.
वक्रतुंड-आवास, रायगड, १७. मोदकेश्वर-नाशिक, १८. मुद्गल गणेश-परभणी. १९.
चिंतामणी-कळंब, यवतमाळ, २०. श्रीसिद्धिविनायक-प्रभादेवी, २१. श्री
सिद्धिविनायक-सीताबडीर्, नागपूर.

*देशातील प्रसिद्ध २१ गणपती*

ॐकार गणेश-प्रयाग, महोत्कट-काश्मीर, विघ्नराज-आंध्र प्रदेश, श्वेता गणेश-केरळ,
गणेशजी-बंगाल, मंगलमूतीर्-मध्य प्रदेश, ढुंढीराज-काशी, बदरी गणेश-हिमालय, गणेश
बर्फ लिंग-हिमालय, नरक विमोचन गणेश-आसाम, ब्रह्मागणेश-बिहार, सीतामढीचा
गणेश-बिहार, षड्भूज गणेश-पंजाब, बली गणपती-राजस्थान, दुर्गकूट गणेश-गुजराथ,
पंचमुखी गणेश-मध्य प्रदेश, खांडोळ्याचा गणेश-गोवरा, गोकर्णाचा गणेश-कर्नाटक,
भदाचलम गणेश- आंध्र, कावेरीकांत विनायक- मदास, कल्पगणपती- ओरिसा.

*जगातील प्रसिद्ध २१ गणपती*

पंचगणपती, नृत्यगणपती, सोळा हातांचा गणपती आणि हेरंब गणेश-नेपाळ,
गणेश-कंबोडिया, द्वारपाल गणेश-तिबेट, महापियेन गणेश-ब्रह्मादेश, गुढविद्या
गणेश-चीन, गणेशमूतीर्-मेक्सिको, गणेश-तुर्कस्तान, गणेश- सिलोन, गणपती-बानिर्ओ,
गणेश-अफगाणिस्तान, गणपती-बाली बेट, बोरीचा गणपती-इण्डोनेशिया, गणेश-जावा, लेखक
गणेश-सयाम, गुरू गणेश-कंबोडिया, गणपती-रोम, इटली, श्री गणेश-जपान, योद्धा गणेश-
इराण.

*गणपतीला आवडणाऱ्या २१ वस्तू*

१) मोदक, २) नारळ, ३) चंदकोर, ४) ओम् ५) खेटव, ६) स्वस्तिक, ७) एकदंत, ८)
विडासुपारी, ९) दूर्वा, १०) नागबंद, ११) मुद्गर, १२) शूल, १३) खट्वाग, १४)
परशु, १५) पाश, १६) मोर, १७) अनंत फूल, १८) अंकुश, १९) कमळ, २०) उंदीर, २१)
केवडा.

*गणपतीची २१ नावं*

१. वक्रतुंड, २. एकदंत, ३. कृष्णपिंगाक्ष. ४ गजवक्र, ५. लंबोदर, ६. विकट, ७.
विघ्नराजेंद, ८. धुम्रवर्ण, ९. भालचंद, १०. विनायक, ११. गणपती, १२. गजानन, १३.
ओंकार, १४. मयुरेश्वर, १५. धुम्रकेत, १६. महोदर, १७. विघ्नराज, १८.
ब्रह्माणस्पती, १९, जगदीश, २०. श्रीगणेश, २१. अदिदेव.

*पूजेसाठी २१ पानं*

दुर्वा, मधुमालती, बोर, माका, बेल, धोतरा, आघाडा, तुळस, डोलरी, कण्हेरी, शमी,
अर्जुन, रुई, विष्णुकांत, जाई, डाळींब, देवदार, केवडा, मारवा, पिंपळ, अगस्ती.

*२१ फुलं*

जास्वंदी, पांढरं कमळ, तांबडं कमळ, जाई, मधुमालती, सोनचाफा, केवडा, बकुळ,
उंडी, सुपारी, नागकेशर, मोगरा, धोतरा, कण्हेरी, प्राजक्त, चवई, नांदुरकी,
गोविंद, मोहोर, शतपत्र.

*२१ पुराणं*

गणेश पुराण, मुद्गल पुराण, ब्रह्मावैवर्त पुराण, अग्नि पुराण, पद्म पुराण,
पद्म पुराण उत्तर, नारद पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, लिंंग पुराण उत्तरार्ध,
वराह पुराण, वराह पुराण उत्तरार्ध, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण,
ब्रह्माांड पुराण, भविष्य पुराण, स्कंद पुराण ब्रह्माखंड, स्कंद पुराण
अवंतीखंड, स्कंद पुराण प्रभासखंड.

*ठार मारलेले २१ राक्षस*

नारांतक, देवांतक, मधु, कैटभ, त्रिपुरासूर, सिंदुरासूर, व्यामोसूर, लोभासूर,
मोहासूर, मदासूर, कमलासूर, विघ्नासूर, मत्सरासूर, देभासूर, अनसासूर, क्रोधासूर,
मायासूर, कामासूर, मेषासूर, मलकासूर.

*गणपतीच्या २१ मूर्ती*

१. बाल गणपती, २. तरुण गणपती, ३. भक्ति विघ्नेश्वर, ४ वीरू-विघ्नेश, ५. शक्ति
गणेश. ६. लक्ष्मी-गणपती, ७. उच्छिष्ट गणपती, ८. महागणपती, ९. उर्ध्व गणपती, १०.
पिंगळा गणपती, ११. हेरंब गणपती, १२. प्रसन्न गणपती, १३. ध्वज गणपती, १४.
उन्मत-उच्छिष्ट गणपती, १५. विघ्नराज, १६. भुवनेश गणपती, १७. नृत्य गणपती, १८.
हरिदा गणपती, १९ भालचंद, २०. शर्पकर्ण, २१ एकदंत.

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०११

राधा झाली बावरी.. ऎकून पावा श्री हरीचा..

पसरला आज चोहीकडे..
श्रीहरीचा रंग...
गोपी गोपीका आता..
दही दुधात झाले दंग..


राधा झाली बावरी..
ऎकून पावा श्री हरीचा..
गुंतली ती पाव्याच्या स्वरात..
तोच तर पाया खरया प्रेमाचा...

चल गड्या रंगून जाऊ..
या दहीकालाच्या सणात.
त्या हंडीला फोडू अन..
न्हावून जाऊ दही दूध लोण्यात





कान्ह्या तुझी मुरली आज ,का साद मजला घालते?

कान्ह्या तुझी मुरली आज ,का साद मजला घालते?
पाव्यातली सुरावली सख्या ,आज काय मजला सांगते ?

फोडुनी मटकी का रे तुझी
तहान नाही भागते?
चोरुनी खावून लोणी-दही
भूक नाही भागते?
का मलाच मुरलीधरा ,तुझी मुरली होऊ वाटते?
पाव्यातली सुरावली सख्या ..........................
पाण्यातली रे मासोळी सख्या
बघ पोहणंही कशी विसरते?
वाहणारी यमुना बघ रे ,
का तिथेच थांबते ?
कोणती रे भूल सख्या ,साऱ्यांना तुझी छ्ळीते?
पाव्यातली सुरावली सख्या ,................
नगरी तुझीच म्हणून का रे
सत्ता तुझीच चालते ?
तुझीच का रे छबी मुकुंदा
गोपिकांना भावते ?
मीरा असो कि आणखी कुणी ,ही राधिका तुला भावते .......
पाव्यातली सुरावली सख्या ...................
कान्हा तू यशोदेचा सख्या
देवकी का तुला पूजिते?
तुझीच माझ्या मनमंदिरी
मूर्ती का रे राहते ?
दूर राहुनी तुझी सख्या रे ,मी चरणधूळ स्पर्शिते ......................
पाव्यातली सुरावली सख्या ,आज काय मजला सांगते ?

शुक्रवार, १५ जुलै, २०११

दत्त दिगंबर दैवत माझे

दत्त दिगंबर दैवत माझे
हृदयी माझ्या नित्य विलासे ॥धृ॥

अनुसूयेचे सत्य आगळे । तीन्ही देवही झाली बाळे
त्रैमुरि अवतार मनोहर । दीणोध्दारक त्रिभुवनी गाजे ॥१॥

तीन शिरेम कर सहा शौभती । हास्य मधुर शुभ वदनावरती
जटाजूट शिरी, पायी घडावा । भस्मविलोपित कांती साजे ॥२॥

पाहुनी प्रेमळ सुंदर मूर्ति । आनंदाचे आसू झरती
सारे सात्विक भाव उमलती । हळू हळू सरते मीपण माझे ॥३॥

ऐरणीच्या देवा

ऐरणीच्या देवा, तुला ठिणगि ठिणगि वाहुं दे
आभाळागत माया तुजीम आम्हांवरी ऱ्हाउं दे ॥धृ॥

लेनं लेऊं गरिबीचं
चनं खाऊं लोकंडाचं
जिनं व्होवं अबरूचं

किरपा तुजी, भात्यांतल्या सुरासंगं गाउं दे! ॥१॥

लक्शिमीच्या हातांतली
चवरि व्हावी वरखाली
इडा-पिडा जाइल आली

धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असूम दे! ॥२॥

सूक थोडं दुक्क भारी,
दुनिया ही भाली-बुरी,
घाव बसंल घावावरी,
सोसायला, झुंजायला, अंगिं बळ येऊं दे ! ॥३॥